भाईजान दिसला या मुलीसोबत, नक्की कोण आहे लकी गर्ल? सलमानच्या नवीन फोटोची तुफान चर्चा

एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकतो.

    सलमान खान – टायगर ३ : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. सलमान खान हा भारतीय मनोरंजन विश्वातला चर्चेतील अभिनेता. सलमानने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमधून लक्षवेधी भूमिका साकारला. बऱ्याच वेळ तो त्यांच्या खाजगी जीवनामुळे सुद्दा चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांची चर्चा फक्त देशभरातच नाही तर जगभरामध्ये होत असते. कधी सलमानने बजरंगी भाईजान मधून रडवलं, कधी दबंग मधून हसवलं तर कधी किक सारख्या सिनेमातून अॅक्शन केली. लवकरच सलमान खान टायगर 3 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच सलमानने सोशल मिडियावर खास फोटो पोस्ट केलाय. हा फोटो पाहून सलमान खानच्या फॅन्सनी एकच कल्ला केलाय.

    नुकताच सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. सलमान खानसोबत एक मुलगीही उभी असलेली दिसत असून ती कॅमेराकडे पाठमोरी आहे. मी तुझ्या पाठीशी कायम असेल असं कॅप्शन सलमानने या फोटोला दिल आहे. सलमान खानचा हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या लग्नाचा अंदाज लावला आहे. त्यामुळे आता या फोटोची प्रचंड चर्चा सुरु आहे. एका यूजरने लिहिले आहे, ‘भाऊ आणि प्रेम.’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘तू लग्न करतोय का?’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘वहिनीचा चेहरा लवकरच समोर येणार आहे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘भाईजान तू लग्न करण्याच्या मूडमध्ये आहेस का?’ अशा हजारो कमेंट्सने सलमानचे चाहते त्याला प्रश्न करत आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

    एक था टायगर आणि टायगर जिंदा है च्या प्रचंड यशाने आदित्य चोप्राचा विश्वास दृढ केला की तो कबीर उर्फ हृतिक रोशन आणि पठाण उर्फ शाहरुख खान यांना त्याच्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये सामील करू शकतो. आदित्य चोप्रा टायगर 3 चा ट्रेलर लॉंच करण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. आदित्य चोप्रा 16 ऑक्टोबरला सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर 3 चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज करणार आहे. टायगर 3 यावर्षी दिवाळीच्या मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे. त्यामुळे टायगर 3 च्या माध्यमातून सलमान खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफीस सुपरहिट कामगिरी करण्यास सज्ज आहे.