मुंबईत सलमान खान सुरू करणार 19 मजली हॉटेल, अत्याधुनिक सुविधांनी युक्त असं हॉटेल

अभिनेता सलमान खान अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे. सलमानच्या हॉटेलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेलच्या कामाला आता वेग येणार आहे.

  Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) कुटुंब हे बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. असे नाही की सलमान खानच्या कुटुंबाने गरिबीचे दिवस पाहिले नाहीत. एक काळ असा होता की खुद्द सलमान खानच्या खिशातही पैसे नव्हते. पण गेल्या 2 दशकात या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. असा हा अभिनेता एक मोठे हॉटेल बनवण्याच्या तयारीत आहे.

  वांद्रे इथल्या कार्टर रोडवर सलमान खान हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे. या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. सलमानची आई सलमा खान यांच्या नावावर हा प्लॉट आहे. हॉटेलच्या प्लॉटवर आधी स्टारलेट सोसायटी होती. जिथे सलमान खान याच्या कुटुंबीयांनी अपार्टमेंट खरेदी केलं होतं. सुरुवातीला या इमारतीचा पुनर्विकास करण्याची योजना होती. मात्र कुटुंबाने नंतर तो बेत बदलल्याचे सांगितले जात आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

  सलमान खानच्या कुंटुंबीयांनी वांद्रे येथील कार्टर रोड येथील भुखंडावर निवासी संकुल बाधण्याची योजना होती. या ठिकाणी सुरुवातीला स्टारलेट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होती. या निवासी इमारतीच्या पुनर्विकासाची योजना आधी आखण्यात आली होती. मात्र, त्यानंतर खान कुटुंबीयांनी हा प्लान रद्द करत तिथे हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच BMC ने मंजूर केल्या इमारतीच्या आराखड्यात 19 मजली हॉटेल दाखविण्यात आले आहे. त्यामुळे सलमान खान हा मुंबईत हॉटेल बांधत असल्याचे समजले. सलमान खानला भेटायला अनेक चाहते उत्सुक असतात. मात्र, त्यांची भेट होत नाही. किमान आता त्याच्या हॉटेलमध्ये जाण्याची त्यांना नक्कीच संधी मिळेल.

  कसे असेल सलमान खानचे हॉटेल

  सप्रे अँड असोसिएटने या हॉटेलचा प्लान तयार केल्याचं समजतंय. 69.90 मीटर उंचीचा हा प्लान आहे. ही इमारत वातानुकूलित असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट असेल. यानंतर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असेल. चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर असेल. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर असेल. यानंतर 7व्या मजल्यापासून 19व्या मजल्यापर्यंत हॉटेलच्या खोल्या असतील. या हॉटेलमधून समुद्रही दिसेल.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

  सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी गुंतवणूक करायला आवडते. आता खान कुटुंब मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत हे हॉटेल बांधणार आहे. या परिसरात अनेक बॉलिवूड स्टार्सची घरे आहेत आणि इथे हॉटेल बांधले तर इथून दिसणारा नजाराही खूप छान असेल. सध्या खान कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

  याआधी मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हॉटेल व्यवसायात पैसे गुंतवले होते. तेंडुलकर रेस्टॉरंट सुरु केले होते. त्याआधीपासून अभिनेता सुनील शेट्टी या व्यवसायत आहे. आता सलमान खान हॉटेल व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दभंग भाईच्या हॉलेटमध्ये आता चाहत्यांना आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, हे हॉटेल सुरू होईपर्यंत सलमानच्या चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.