सलमान खानची ‘रिअल इस्टेट’मध्ये एंट्री; ‘या’ प्रॉपर्टीसाठी मिळणार तब्बल एक कोटी भाडे, डिपॉजिट घेतलं…

अभिनेता सलमान खानने रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात एंट्री केली आहे. सलमान खानने मुंबईतील सांताक्रूझ परिसरात एक व्यावसायिक मालमत्ता 60 महिन्यांसाठी भाड्याने दिली आहे. ही मालमत्ता एकूण 2,140.71 चौरस मीटर क्षेत्रात असून, यासाठी त्याला तब्बल एक कोटी रुपयांचं भाडं मिळू शकते.

    मुंबई : अभिनेता सलमान खानने रिअल इस्टेट (Real Estate) क्षेत्रात एंट्री केली आहे. सलमान खानने मुंबईतील सांताक्रूझ परिसरात एक व्यावसायिक मालमत्ता 60 महिन्यांसाठी भाड्याने दिली आहे. ही मालमत्ता एकूण 2,140.71 चौरस मीटर क्षेत्रात असून, यासाठी त्याला तब्बल एक कोटी रुपयांचं भाडं मिळू शकते. इतकेच नाहीतर त्याला या प्रॉपर्टीसाठी चांगलं डिपॉजिटही मिळणार आहे.

    सलमान खानने त्याची मालमत्ता रिटेल प्रायव्हेट लिमिटेडला 60 महिन्यांसाठी लीजवर दिली आहे. स्वत:च्या मालकीची सांताक्रुझ येथे 25 हजार चौरस फुटांची जागा असून, ही जागा त्याने भाडेतत्त्वावर दिली आहे. ऑगस्टमध्ये यासंदर्भात करार झाला आहे. यामध्ये पोटमाळ्यावरील जागा, तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला या ठिकाणच्या जागेचा समावेश आहे. मुंबई आयआयटीतून पदवीचे शिक्षण घेतलेल्या मयांक गुप्ता आणि लंडन येथील किंग्स्टन विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या ललित यांनी ही मालमत्ता सलमान खान याच्याकडून भाड्याने घेतल्याचे समजते.

    5.40 कोटींचे डिपॉजिट

    सांताक्रुझ येथील या प्रॉपर्टीसाठी सलमान खान याला दर महिन्याला तब्बल एक कोटी रुपयांचे भाडे मिळणार असल्याची माहिती दिली जात आहे. तसेच या कार्यालयासाठी संबंधित खासगी कंपनीने 5 कोटी 40 लाख रुपये डिपॉझिट दिले असल्याचेही सांगण्यात आले. पाच वर्षांच्या मुदतीसाठी संबंधित कंपनीला ही जागा भाडेतत्त्वावर दिली असून, ऑगस्टपासून सुरू झालेल्या पहिल्या वर्षासाठी सलमान खान याला प्रत्येक महिन्याला 90 लाख रुपये भाडे मिळणार असल्याचे समजते. दरवर्षी या भाड्याच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे.