तब्बल २० वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितलं सलमानबरोबरच्या ब्रेकअपचं खरं कारण, त्याकाळी सलमानला भेटण्यासाठी असा केला होता जुगाड!

भारतात आल्यानंतर सोमीनं काही मॉडलिंगचे प्रकल्प केले आणि काही चित्रपटसुद्धा केले. त्यानंतर काही दिवसांनी तिची सलमान सोबत भेट झाली. आणि त्यानंतर या दोघांच्यात प्रेम-प्रकरण सुरु झालं होतं.

    अभिनेता सलमान खानची प्रेमप्रकरणे बॉलीवूडमध्ये बरीच चर्चेत राहिली आहेत. सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सलमान खानची जुनी प्रेयसी  सोमी अलीनं सलमानवर धोका दिल्याचा धक्कादायक आरोप लावला आहे. सोमी अली ही एक अभिनेत्री आणि मॉडेलसुद्धा होती. ती मूळची पाकिस्तानची आहे.

    सलमानला भेटण्यासाठी असा केला जुगाड

    सोमीनं वयाच्या सोळाव्या वर्षी सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पहिला होता. आणि त्यांनतर ती सलमानच्या प्रेमात पडली होती. तिला सलमान खानसोबत लग्नं करायचं होतं. त्यामुळे ती भारतात यायची तयारी करू लागली. तिनं आपल्या आईलासुद्धा हे सांगितलं. मात्र तिनं आपल्या वडिलांना असं सांगितलं. भारतात असणाऱ्या आपल्या काही नातेवाईकांना भेटण्याची माझी इच्छा आहे.

    भारतात आल्यानंतर सोमीनं काही मॉडलिंगचे प्रकल्प केले आणि काही चित्रपटसुद्धा केले. त्यानंतर काही दिवसांनी तिची सलमान सोबत भेट झाली. आणि त्यानंतर या दोघांच्यात प्रेम-प्रकरण सुरु झालं होतं. त्यावेळी सोमी केवळ १७ वर्षांची होती. सलमान आणि सोमी तब्बल ८ वर्षे नात्यात होते. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले. आणि मग सोमी परत युएसला परतली.

    मात्र नुकताच सोमीनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्यान सोमीनं म्हटलं आहे. की सलमान आणि तिला विभक्त होऊन तब्बल २०  वर्षांचा काळ लोटला आहे. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. मात्र आम्ही नात्यात असताना सलमान मला धोका देत होता. त्यामुळे मी त्याच्यापासून विभक्त झाले होते.