सलमान खानच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवली, मेहुणा आयुष शर्माही आता बुलेटप्रूफ कारमधून प्रवास करणार!

सलमान खानच्या कौटुंबिक सुरक्षेमध्ये आता विशेषत: त्याचा मेहुणा आयुष शर्माचा समावेश आहे

  अलीकडेच पोलिसांनी बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा कडक केली आहे, आता त्याच्या कुटुंबाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्या हे त्यामागचे कारण आहे. त्याला मुंबई पोलिसांनी आधीच वाय-प्लस सुरक्षा पुरवली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता सलमानचे कुटुंब आणि त्याचा मेव्हणा म्हणजेच त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा यांची सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.

  आयुष शर्माच्याही सुरक्षेत वाढ

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या मेहुण्यालाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आता तो जिथे जाईल तिथे त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असतील. जर त्याला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी बाहेर जावे लागले तर त्याला सलमानच्या बुलेटप्रूफ वाहनाने प्रवास करण्यास सांगितले आहे. सुरक्षेच्या कडक खबरदारीमुळे सलमानला आधीच त्याचे वैयक्तिक शस्त्र ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

  या कारणामुळे वाढवली सुरक्षा

  सध्या लक्ष नाही, पण 2022 पासूनच सलमानला गँगस्टर बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या येतात. तेव्हापासून मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येतो. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये धमक्या मिळाल्यानंतरही मुंबई पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था केली होती. आता यात वाढ करत, त्याच्या कुटुंबालाही सुरक्षा देण्यात आली आहे.

  सलमानकडे आहे खास बुलेटप्रूफ कार

  अलीकडेच सलमानने खास आपल्या सुरक्षेसाठी महागडी बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती. आता त्यांच्या  याच वाहनातून प्रवास करण्यास सांगितले आहे. दररोज मिळणाऱ्या धमक्यांमुळे संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. या कारणास्तव मुंबई पोलिसांनीही त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. आयुषच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो ‘रुस्लान’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. आता चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आयुषच्या सुरक्षेसाठी पोलीसही तैनात असतील. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेवरही भर दिला जात आहे. सुरक्षेच्या या मुद्द्यावर संपूर्ण बॉलिवूड आणि सलमानचे चाहते त्याला सतत पाठिंबा देत आहेत.