मालेगावात सलमानचे जबरा फॅन्स! चक्क चित्रपटगृहात फोडले फटाके, बंद करावा लागला शो

सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात बॅाम्ब, रॅाकेट्स, फुलझाडं लावून आतषबाजी केली त्यामुळे शो मध्येच बंद करावा लागला.

    मालेगाव : रविवारी दिवाळीच्या मुहुर्त साधत अभिनेता सलमान खानचा टायगर चित्रपट सर्वत्र रिलीज झाला.  या चित्रपटानं पहिल्या दिवशी 44 कोटीचा व्यवसाय केला (Tiger 3 box office collection day 1) या चित्रपटाबद्दलचा प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. मात्र, या सगळ्या धामधुमीत  सलमानच्या चाहत्यांनी येथील नाशिकच्या मालेगावातील एका चित्रपटगृहात फटाके उडवले. या घटनेमुळे चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली. चाहत्यांनी गोंधळ घातल्यामुळे चित्रपटाचा खेळ मध्येच बंद करावा लागला.

    नेमकं काय घडलं

    मालेगावातील मोहन चित्रपटगृहात सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाचा शो सुरू होता. उत्साहाच्या भरात चाहत्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणावर चाहते  उपस्थित होते. त्यापैकी काही उत्साही चाहत्यांनी चित्रपट सुरू झाल्यानंतर वेगवेगळे फटाके फोडण्यास सुरुवात केली. 10 मिनिटे ही आतिषबाजी सुरू होती. यावेळी फॅन्सनी बॉम्ब, रॉकेट्स, फुलझाड यांची आतषबाजी केली. तर, बाल्कनीतील प्रेक्षक शिट्या वाजवून नाचत त्याचे समर्थन करीत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाली आहे.  या घटनेची माहिती मिळताच रात्री साडेअकरा वाजता पोलीस चित्रपटगृहात दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाचा बंबही पोहोचला. या सगळ्या गोंधळात चित्रपटाचा शो बंद करावा लागला.