दोन्ही भाऊ राहतात वेगळे पण सलमान ‘या’ कारणामुळे अजूनही राहतो गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये

लग्नानंतर अरबाज खान आणि सोहेल खान वेगळे राहू लागले, मात्र सलमान खानने घर सोडले नसून तो अद्यापही तिथेच राहतो.

  सलमान खानचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Salman Khan Galaxy Apartment) रविवारी गोळीबार झाला. सलमानच्या घराबाहेरील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हवेत तीन राऊंड गोळीबार करून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांनी अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. गुरुग्राममधील कालू नावाचा आरोपी या प्रकरणात सामील असल्याचे वृत्त आहे.

  ज्याप्रकारे सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत आणि आता त्याच्या घराबाहेर गोळीबार सुरू आहे, त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. चाहत्यांना अभिनेत्याच्या सुरक्षेची चिंता आहे. सतत धमक्या देऊनही सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडू शकत नाही. यामागचे कारणही चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. याचे कारण खुद्द सलमान खानने एका शोदरम्यान सांगितले होते.

  ‘या’ कारणामुळे सलमानला प्रिय आहे त्यातं घर

  आई सलमा खानच्या प्रेमामुळे सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणे पसंत करतो. हा बेडरूम आणि हॉलचा सेट असल्याचं सांगण्यात येत आहे. पण, सलमान खानला ते खूप आवडते. तो त्याच्या मुळांशी जोडलेला आहे आणि त्याला तसाच राहायला आवडतो. 2009 मध्ये फराह खानच्या एका टीव्ही शोमध्ये सलमान खानने कबूल केले होते की त्याच्या आई-वडिलांचे प्रेम त्याला या घरापासून दूर जाऊ देत नाही.

  सलमान खान म्हणाला होता, ‘आम्ही मोठे होतो तेव्हा आई आणि वडिलांजवळ जाऊन झोपायचो’. आजही सलमान खानसाठी त्याचे कुटुंब आणि आई-वडील प्रथम येतात. त्याचे आई-वडील सलमान खानच्या फ्लॅटच्या खाली राहतात. लग्नानंतर अरबाज खान आणि सोहेल खान वेगळे राहू लागले, मात्र सलमान खानने घर सोडले नाही.

  सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याचा पुढचा चित्रपट ‘सिकंदर’ आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी ईदच्या मुहूर्तावर अभिनेत्याने या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगादास करत आहेत.