salman khan and jacqueline fernandez

सलमानच्या(Salman Khan) अत्यंत जवळच्या मानल्या जाणार्‍या जॅकलीनला(Jacqueline Fernandez) १० डिसेंबर रोजी रियाध येथे प्रस्तावित असलेल्या दा-बँग कॉन्सर्टमधून बाहेर पडावं लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जॅकलीनला येत्या आठवड्यात ईडीच्या (Ed Inquiry Of Jacqueline Fernandez) वतीनं चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईबाहेर जाण्यावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

    स्वत: एका सुपरहिट चित्रपटाच्या शोधात असलेला सलमान खान सध्या आणखी एका गोष्टीचा शोध घेत आहे. सलमान आणि जॅकलीन फर्नांडीस(Salman Khan Have To Find Replacement For Jacqueline Fernandez) यांचं नातं सर्वांनाच माहित आहे. चांगले मित्र असलेले सलमान-जॅकलीन(Salman Khan Jacqueline Fernandez) ‘किक’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसले आहेत. सलमानच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणार्‍या जॅकलीनला १० डिसेंबर रोजी रियाध येथे प्रस्तावित असलेल्या दा-बँग कॉन्सर्टमधून बाहेर पडावं लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    ईडीच्या जाळ्यात अडकलेल्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नाव समोर आल्याचा फटका जॅकलीनला बसला आहे. सुकेशनं जॅकलीनला कोट्यवधी रुपयांची गिफ्टस दिल्याचं निदर्शनास आल्याचा परिणाम दा-बँगमधील तिच्या समावेशावर झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणामुळं जॅकलीन संकटात सापडली आहे. जॅकलीनला येत्या आठवड्यात ईडीच्या वतीनं चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईबाहेर जाण्यावरही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं रियाध कॉन्सर्टसाठी जॅकलिनच्या रिप्लेसमेंटसाठी सलमानचा शोध सुरू झाला आहे. तिच्या जागी सलमानची आणखी एक मैत्रीण डेझी शाहची वर्णी लागली तर कोणाला नवल वाटणार नाही.