alizeh bollywood debut

सलमान खानची भाची बॉलिवूडमध्ये पदार्पण (Salman Khan Niece Alizeh Bollywood Debut) करणार आहे. अलिझेह ही सलमान खानची (Salman Khan) बहीण अल्विरा अग्निहोत्रीची मुलगी आहे.

  बॉलिवूडच्या घराणेशाहीवर अनेकदा टीका केली जाते. स्टार किड्सना कायम ट्रोल केलं जात असत. अशातच आता सलमान खानची भाची बॉलिवूडमध्ये पदार्पण (Salman Khan Niece Alizeh Bollywood Debut) करणार आहे. अलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) असं सलमान खानच्या भाचीचं नाव आहे. अलिझेह ही सलमान खानची (Salman Khan) बहीण अल्विरा अग्निहोत्रीची मुलगी आहे. अलिझेहने तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले आहे. मात्र अलिझेह आपले पदार्पण व्यावसायिक चित्रपटातून करत नसून एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माता आणि दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांच्या चित्रपटात ती काम करत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ali (@alizehagnihotri)

  अलिझेहच्या पदार्पणाबाबत तिचे वडील आणि अभिनेते अतुल अग्निहोत्री २०१९ साली एका मुलाखतीत म्हणाले होते, “याबद्दल आत्ताच काही सांगता येत नाही. एक वडील म्हणून माझी एकच इच्छा आहे की तिने संपूर्ण तयारी करावी आणि उत्कृष्ट काम करावे. माझ्या कुटुंबाने चित्रपटसृष्टीतले अनेक चढ उतार पाहिले आहेत. त्यामुळे ते नक्कीच हे लक्षात ठेवतील.”

  अलिझेह अग्निहोत्री ही २२ वर्षाची असून ती अनेकदा सलमान खानबरोबर दिसली आहे. ती सलमान खानच्या ‘दबंग ३’ चित्रपटात झळकणार होती मात्र तिच्या वडिलांनी त्यासाठी नकार दिला होता. अलिझेह अग्निहोत्रीला मोठा भाऊ आहे अयान अग्निहोत्री असे त्याचे नाव आहे. तिने सरोज खानकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.