salman khan

सलमानच्या जवळच्या माणसाने सांगितलं की, सलमानने या धमकीला खूप नॉर्मल पद्धतीने घेतलं आहे. किंवा त्याचे पालक टेन्शनमध्ये यायला नको म्हणून तो तसं दाखवतंही असेल.

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला (Salman Khan) नुकतीच ईमेलद्वारे जीवे मारण्याची (Threatening Via Email) धमकी मिळाली होती. त्यानंतर त्याच्या घराबाहेरची सुरक्षा व्यवस्था (Salman Khan Security) वाढवण्यात आली. मात्र सलमानच्या जवळच्या काही माणसांना सांगितलं की, सलमानला कोणत्याही धमकीमुळे काही फरक पडत नाही. त्याला मुक्तपणे जीवन जगायला आवडतं.

सलमानच्या जवळच्या माणसाने सांगितलं की, सलमानने या धमकीला खूप नॉर्मल पद्धतीने घेतलं आहे. किंवा त्याचे पालक टेन्शनमध्ये यायला नको म्हणून तो तसं दाखवतंही असेल. एकत्र राहणाऱ्या सलमानच्या कुटुंबाबद्दल ही गोष्ट खास आहे की, कुणीही त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचं दाखवतं नाहीत. सलमानचे वडील सलीम खानसुद्धा खूप शांत आहेत. मात्र संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे की, ते रात्री काळजीने झोपत नाहीयेत.

धमकीचा ईमेल
सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. ज्यात सलमानसोबत बोलणी करण्याची मागणी करण्यात आली. रोहित गर्ग नावाने हा ईमेल करण्यात आला आहे. ईमेलमध्ये लिहिलं आहे की, गोल्डीला तुझा बॉस सलमान खानसोबत बोलायचं आहे. त्याने मुलाखत बघितलीच असेल. नसेल बघितली तर त्याला बघायला सांग. मॅटर क्लोज करायचा असेल तर बोलणी होऊ देत. समोरासमोर बोलायचं असेल तर तसही सांग. अजुन वेळ आहे म्हणून कळवलं आहे. पुढच्या वेळी मोठा झटका मिळेल. ई मेल मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानंतर सलमानच्या घराजवळ म्हणजे गॅलॅक्सीजवळ पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली.

जेलमधून धमकी
याआधीही सलमानला अशी धमकी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोईने जेलमधून सलमानला धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्याने म्हटलं की, काळवीट प्रकरणात सलमानने माफी मागायला हवी, नाहीतर परिणाम वाईट होतील. संपूर्ण समाजाची सलमानने माफी मागावी, असं बिष्णोईचं म्हणणं आहे. मला या प्रकरणात लहानपणापासून सलमानवर राग आहे. त्याने माझ्या समाजातील सदस्यांना पैसे खिलवण्याचा प्रयत्न केला होता.