गोळीबार प्रकरणानंतर दुबईत बेली डान्सचा आनंद घेताना दिसला भाईजान!

गॅलक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर त्यांला पहिल्यांदाच तो दुबईतील एका इव्हेंटमध्ये सामिल झालेला पाहायला मिळाला.

  अभिनेता सलमान खान सध्या चागंलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधील घराबाहेर गोळीबार (Salman khan house firing case) झाल्याची घटना चांगलीच गाजली. या प्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली. या घटनेनंतर कलाकारांसह चाहत्यांनी भाईजानबदद्ल काळजी व्यक्त केली होती. मात्र आता चाहत्यांनी सुटकेचा निश्वा:स सोडला जेव्हा सलमान खान गोळीबाराच्या घटनेनतंर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. सध्या सलमान खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बेली डान्सचा एन्जॉय करताना दिसत आहे.

  सार्वजनिक कार्यक्रमाला सलमानची हजेरी

  अलीकडेच सलमान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता आणि त्याच्यासोबत त्याचा बॉडीगार्ड शेराही होता. त्यांना Y+ सुरक्षा देखील देण्यात आली होती, जी त्यांना महाराष्ट्र सरकारने प्रदान केली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेरले असल्याने अभिनेता त्याच्या कारमधून बाहेर पडताना आणि पोज न देता विमानतळाच्या आत जाताना दिसला. आता दुबईतील अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हिरव्या रंगाचे जॅकेट घालून डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Snehkumar Zala (@snehzala)

  सलमानच्या गोळीबार प्रकरणानंतर त्याने आपल्या चाहत्यांना पोस्टद्वारे संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुबईतील ‘कराटे कॉम्बॅट’ इव्हेंटला गेल्याचा खुलासा सलमानने केला. एक व्हिडिओ शेअर करत भाईजान म्हणाला, “मी दुबईत आहे आणि उद्या मी कराटे कॉम्बॅट इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही, पण या मुलाला मी वयाच्या दोन वर्षापासून ओळखतो.

  आता सलमानचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो बेली डान्सचा आनंद लुटताना दिसत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दिग्दर्शक एआर मुरुगादास दिग्दर्शित ‘सिकंदर’मध्ये अभिनेता दिसणार आहे.