सलमान खानच्या सिकंदर चित्रपटासाठी मिळाली हिरोईन, ‘ही’ बॉलिवूड सौंदर्यवती भाईजानसोबत पहिल्यांदाच स्क्रिन करणार शेअर!

सलमान खाना आता त्याच्या आगामी सिंकदर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता त्याच्या चित्रपटाची हिरोईन म्हणून किआरा अडवाणीचं नाव समोर येत आहे.

    सध्या सलमान खान त्याच्या घरात म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराच्या (Salman Khan House Firing Case) घटनेपासून चर्चेत आहे. नुकतचं त्याच्या दुबईमधून एक व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये तो बेली डान्सचा आनंद घेताना दिसला. सलमान खानचा आगामी सिंकदर चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटींग मे महिन्यात सुरू होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अद्याप चित्रपटाच्या हिरोईनचं नाव समोर आलं नव्हत. सलमान खानची हिरोईन कोण असणार याबद्दल प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. आता रिपोर्टनुसार अखेर सलमानच्या सिकंदर या चित्रपटाला हिरोईन सापडली आहे. कियारा अडवाणी त्याच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास सलमान-कियारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

    सलमानच्या चित्रपटाच कियारा

    कियारा अडवाणी सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारू शकते ही बातमी तेव्हा समोर आली जेव्हा कियारा निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट झाली. साजिद सिकंदर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत आणि अशा परिस्थितीत कियारा त्यांच्या कार्यालयाबाहेर दिसल्याने ती या चित्रपटात मुख्य अभिनेत्री असू शकते असे संकेत मिळत आहेत. सलमानने ईदच्या मुहूर्तावर त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटाची घोषणा केली होती. यासोबतच सिकंदर 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे सुपर डायरेक्टर ए आर मुरुगादास करत आहेत.

    कियारा अडवाणीचे आगामी चित्रपट

    कियारा अडवाणीची गणना सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. कियाराला बॅक टू बॅक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपट वॉर २ मध्ये कियारा हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर ती दक्षिणेतील अभिनेता राम चरणसोबत गेम चेंजर या चित्रपटातही दिसणार आहे. दिग्दर्शक फरान अख्तरने देखील कियाराला त्याच्या डॉन 3 चित्रपटासाठी कास्ट केले आहे. कियारा शेवटची सत्यप्रेम की कथा या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने जगभरात 117 कोटींची कमाई केली होती.