salman khan in bigg boss marathi

बिग बॉस मराठीच्या(Bigg Boss Marathi 3) सेटवर सलमान खानची (Salman Khan In Bigg Boss Marathi 3)धमाकेदार एन्ट्री होणार आहे. घरातील सदस्य सलमानला बघून खुश तर होतीलच, पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार असल्याचं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं या आठवड्यातील बिग बॉस मराठीच्या चावडीवर(Bigg Boss Marathi Chavdi) धमाल उडणार आहे.

    ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होते तो क्षण आता आला आहे. ‘बिग बॉस मराठी ३’(Bigg Boss Marathi 3) च्या चावडीवर सदस्यांना सरप्राईझ(Surprise For Bigg Boss Marathi Contestant) मिळणार आहे. बिग बॉसच्या मंचावर भाईजान म्हणजेच सलमान खान(Salman Khan In Bigg Boss Marathi 3) हजेरी लावणार आहे. कारण सिनेप्रेमींचा लाडका, यारों का यार बॉलीवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे.


    बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमानची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. घरातील सदस्य सलमानला बघून खुश तर होतीलच, पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार असल्याचं म्हणायला हरकत नाही. त्यामुळं या आठवड्यातील बिग बॉस मराठीच्या चावडीवर धमाल उडणार आहे.

    नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमुळं प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं की, आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा. त्याचसोबत सलमाननेही सांगितलं की, मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर… याचसोबत त्यानं ‘ओ भाऊ जरा चावडीवर या’, असं देखील म्हटलं आहे. सलमान सध्या ‘अंतिम’ या चित्रपटामुळं चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मांजरेकरांनी केलं असल्यानं सलमान येणार हे ठरलेलंच होतं. त्याप्रमाणं सलमान बिग बॅास मराठीच्या चावडीच्या माध्यमातून ‘अंतिम’चं प्रमोशन करताना दिसणार आहे.