salman-khan-1528613912

गुरुवारी ईदच्या खास मुहूर्तावर सलमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली. एक पोस्ट शेअर करताना त्याने चाहत्यांना शुभेच्छा देत नव्या चित्रपटाबद्दल सांगितलं.

  ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने (Salman Khan ) त्याच्या आगामी ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास दिग्दर्शित करणार असून त्यांनी यापूर्वी ‘गजनी’, ‘हॉलिडे’ आणि ‘अकिरा’ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. साजिद नाडियादवाला याचे निर्माते असतील.

  सलमान खाननं चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

  गुरुवारी ईदच्या खास मुहूर्तावर सलमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाची घोषणा केली. एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘या ईद, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘मैदान’ पहा आणि पुढच्या ईदला या आणि ‘सिकंदर’ला भेटा… तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा.’

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

  नाडियादवालासोबत अनेक हिट चित्रपट दिले

  निर्माता साजिद नाडियादवालासोबत सलमानने ‘जुडवा’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘किक’सह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘सिकंदर’पूर्वी मुरुगदास आणि सलमानने 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘जय हो’ चित्रपटातही एकत्र काम केले होते. मुरुगदास हे त्या चित्रपटाचे लेखक होते.

  गेल्या 10 वर्षांत ईदला सलमानचे 7 चित्रपट प्रदर्शित झाले

  आताच्या ईद कनेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 10 वर्षांत सलमानचा एकही चित्रपट केवळ 2020 आणि 2022 मध्ये ईदला रिलीज झालेला नाही. 2015 ते 2024 पर्यंत सलमान खानचे 7 चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत.