salim khan on vicky and katrina marriage

डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाही थाटात विकी आणि कतरिना विवाह बंधनात अडकणार आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार नसल्याची माहिती आधीच मिळाली होती. अशातच आता कतरिना आणि विकीच्या लग्नावर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया(Salim Khan Reactio On Vicky And Katrina Marriage) दिली आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. (Vicky Kaushal And Katrina kaif Wedding) मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाही थाटात विकी आणि कतरिना विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज हजेरी लावणार आहेत. मात्र बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कतरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार नसल्याची माहिती आधीच मिळाली होती. अशातच आता कतरिना आणि विकीच्या लग्नावर सलमान खानचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया(Salim Khan Reactio On Vicky And Katrina Marriage) दिली आहे.

    सलीम खान यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कतरिना आणि विकीच्या लग्नावर वक्तव्य केले. ‘मी याविषयावर काय बोलू… आजकाल फक्त मीडियाकडेच सर्व काही बोलण्यासारखे आहे’ असे सलीम खान यांनी सांगितले आहे.

    कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे, असे म्हटले जात आहे.