samantha

समांथा मुंबई एअरपोर्टवर (Samantha On Mumbai Airport)  स्पॉट झाली. यावेळचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही फोटोग्राफर्स तिला, ‘हिंदी बोलता येते का?’ असं विचारताना दिसत आहेत.

    अभिनेत्री समांथा  (Samantha) रुथ प्रभू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा समांथा मागच्या काही काळापासून सातत्यानं तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा मुंबई एअरपोर्टवर (Samantha On Mumbai Airport)  स्पॉट झाली. यावेळचा तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही फोटोग्राफर्स तिला, ‘हिंदी बोलता येते का?’ असं विचारताना दिसत आहेत. पण यावर समांथाने जे उत्तर दिलं त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये समांथा एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसत आहे. तिनं कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कही लावला होता. यावेळी ती तिथे असलेल्या फोटोग्राफर्ससोबत खूपच आपुलकीनं वागताना दिसली. एका फोटोग्राफरनं सामंथाला यावेळी तुला हिंदी बोलता येतं का असा प्रश्न विचारला. त्यावर समांथाने ‘थोडं- थोडं’ असं हिंदीतून उत्तर देत सर्वांची मनं जिंकली. समांथाचा हा व्हिडिओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

    समांथाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे काही दाक्षिणात्य चित्रपट आहे. तसेच ती अलिकडच्या काळात मुंबईत दिसत असल्यानं लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान काही काळापूर्वीच ती ‘पुष्पा’ चित्रपटाच्या आयटम नंबरमध्ये दिसली होती. जे प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.