sanjana dance

स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ (Star Pravah Dhumdhadaka 2022)या नववर्ष विशेष कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte)या मालिकेतील संजना म्हणजेत रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosale Lavani Dance) दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी (New Year Party) रंगणार आहे.

  धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाह (Star Pravah New Year Celebration)वाहिनी सज्ज झाली आहे.

  sanjana in star pravaah dhumdhadaka

  स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ (Star Pravah Dhumdhadaka 2022) या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या खास कार्यक्रमात ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte) या मालिकेतील संजना म्हणजेत रुपाली भोसलेच्या (Rupali Bhosale Lavani Dance) दिलखेचक अदांनी नवीन वर्षाची पार्टी (New Year Party) रंगणार आहे.

  sanjana lavni

  संजनानं ठसकेबाज लावणी सादर करत या कार्यक्रमात रंगत आणली आहे. संजनाचा ग्लॅमरस अंदाज मालिकेतून पाहायलाच मिळत आहे. या कार्यक्रमातील तिचा मराठमोळा ठसकाही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

  या कार्यक्रमासाठी रुपाली सध्या कसून सराव करत आहे. लावणीच्या माध्यमातून रसिकांवर मोहिनी घातल्यानंतर नवीन वर्षात नवनवीन प्रोजेक्टस आपल्या नावे करण्याचा तिचा मानस आहे.