संजय दत्तचा कांचापेक्षा भयानक लूक, थलापथी विजय आणि त्रिशा कृष्णन 14 वर्षांनंतर एकत्र, Thalapathy 67 ची चर्चा तर होणारच

‘थलापथी 67’च्या निर्मात्यांनी चित्रपटाविषयी अपडेट देऊन प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. अशातच, सिनेमाचे शूटिंग सुरु असतानाच मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटात संजय दत्त सामील झाल्याची घोषणा केली. संजय दत्त या घोषणेविषयी म्हणतो की, “जेव्हा मी Thalapathy 67 चं वन लायनर ऐकलं तेव्हाच मी ठरवलं की मला या चित्रपटात काम करायचं आहे. या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

    केजीएफ नंतर दाक्षिणात्य सिनेमांच्या अनेक ऑफर्स संजय दत्तला(Sanjay Dutt) मिळत आहेत. नुकतीच संजय दत्तच्या Thalapathy 67 मधील एन्ट्रीची घोषणा करण्यात आली आहे. अलीकडेच प्रॉडक्शन हाऊस 7 स्क्रीन स्टुडिओने आपला आगामी चित्रपट ‘थलापथी 67’ची (Thalapathy 67) थलापथी विजयसह घोषणा केली. या सिनेमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. अशातच, प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या कलाकारांची नावे जाहीर केली आहेत ज्यामध्ये संजय दत्त, अर्जुन, गौतम मेनन, मॅथ्यू थॉमस, मन्सूर अली खान आणि त्रिशा कृष्णन यांचा समावेश आहे.

    अ‍ॅक्शन थ्रिलर असलेला ‘थलापथी 67’च्या निर्मात्यांनी चित्रपटाविषयी अपडेट देऊन प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. अशातच, सिनेमाचे शूटिंग सुरु असतानाच मेकर्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटात संजय दत्त सामील झाल्याची घोषणा केली. संजय दत्त या घोषणेविषयी म्हणतो की, “जेव्हा मी Thalapathy 67 चं वन लायनर ऐकलं तेव्हाच मी ठरवलं की मला या चित्रपटात काम करायचं आहे. या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

    संजय दत्तचा Thalapathy67 चित्रपटातला भयानक अवतार बघून फॅन्सना धडकी भरली आहे. अग्नीपथमधल्या कांचापेक्षाही हा लूक वरचढ असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

    sanjay
    तसेच, या प्रोजेक्टमध्ये थलापथी विजय सर आणि त्रिशा कृष्णन यांची उत्कृष्ट ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार असून, ‘थलापथी 67’ या चित्रपटामध्ये हे दोन्ही कलाकार 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकत्र येत आहेत. याबद्दल प्रेक्षकांना अपडेट देत निर्मात्यांनी सोशल मीडियावर त्रिशा कृष्णनचा एक फोटो शेअर केला आहे.

    ‘थलापथी 67’ हा खरोखरच एक खास प्रोजेक्ट आहे कारण ‘मास्टर’ आणि ‘वरिसु’ या दोन ब्लॉकबस्टर्सनंतर थलापथी विजय सर आणि 7 स्क्रीन स्टुडिओ यांचे तिसऱ्यांदा एकत्र येत आहे. तसेच या सिनेमाद्वारे थलापथी विजय आणि लोकेश कनागराज पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी यापूर्वी ‘मास्टर’ या चित्रपटात एकत्र काम केले असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

    7 स्क्रीन स्टुडिओच्या ‘थलापथी 67’ या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली असून, याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन यांना पाहायला मिळणार आहे.