sanjay dutt

अभिनेता संजय दत्तने सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याला धक्काबुक्की केली, ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

    सोशल मीडियावर सेलेब्रिटिंची मोठी फॅन फोलोविंग असते. आपले आवडते कलाकार जिथं दिसले तीथं फॅन्स त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपड करत असतात. अनेकदा कलाकार फॅन्ससोबत फोटो काढून घेतात. मात्र कधी कधी सेलेब्रिटीही वेगळ्या मूड मध्ये असल्याने फोटोसाठी नकार देतात. आणि नेटिझन्सच्या ट्रोलिंगला त्यांना सामोरं जावं लागत. असचं काहीसं घडलयं अभिनेता संजय दत्तसोबत. नुकतचं संजय दत्त (Sanjay Dutt) मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चाहत्याला बाजूला केलं, त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर  जोरदार टीका होत आहे.

    फोटो काढण्याच्या मूडमधे नव्हता संजूबाबा

    ‘संजू’ फोटो काढण्याच्या मूडमध्ये नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो पापाराझींशीही बोलला नाही. विमानतळावर एका उत्साही फॅन त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी त्याच्या जवळ आला मात्र संजय दत्तने त्याच्यासोबत सेल्फी न काढता त्याला दूर सारलं.  संजय दत्त त्याच्या फॅनला दूर ढकलताना दिसला. यावेळी त्याने शांतता राखली आणि पटकन त्याच्या गाडीकडे निघाला

    संजय दत्त दिसणार ‘या’ चित्रपटात

    संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालां तर आगामी काळात तो रवीना टंडन, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ‘बाप’ चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात तो झळकणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.