‘धूम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवींचं निधन, मॉर्निंग वॉक दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने घेतला जगाचा निरोप

रविवारी १९ नोव्हेंबर रोजी मॉर्निंग वॉक करताना संजय गढवी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांन कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    ‘धूम’ या (Dhoom) सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhavi) यांचे निधन झाले आहे. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आज संध्याकाळी  त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Sanjay Gadhavi Passes Away) केले जाऊ शकतात.

    मॉर्निंग वॉक करताना आला  हृदयविकाराचा झटका

    लोखंडवाला बॅकरोडमध्ये संजय गढवी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने जवळच्या सर्वात मोठ्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संजय गढवी यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबासह संपूर्ण सिनेसृष्टीला मोठं नुकसान झालं आहे.

    संजय गढवी ‘या’ विषयावर चित्रपट बनवणार होते

    लोखंडवाला अंधेरी पश्चिम येथील ग्रीन एकर सोसायटीत संजय गढवी राहतात, त्याच सोसायटीत श्री देवी राहत होत्या. नुकतेच संजय गढवी यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे.