sankarshan karhade in kitchen kallakar

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar)हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्याचा टिझर नुकताच वाहिनीवर सादर झाला. किचन कल्लाकारमध्ये संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade)या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

    गीतकार, लेखक, अभिनेता अशा विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा संकर्षण कऱ्हाडे आता सूत्रसंचालक बनला आहे. झी मराठीवरील(Zee Marathi) प्रत्येक कार्यक्रम हा प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतो आणि त्यातील कलाकार हे देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. असाच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade To Host Cookery Show). एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar)हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, त्याचा टिझर नुकताच वाहिनीवर सादर झाला.

    यामध्ये संकर्षण म्हणताना दिसतोय की, आता भल्या-भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार. यावरून तर असंच दिसत की पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा या किचनमध्ये कस लागणार आहे. आता हे कलाकार किचनमध्ये कसा कल्ला करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा कुकींगशी संबंधीत शो पाहण्यासाठी खाद्यप्रेमींसोबत मनोरंजनाची आवड असणाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

    या शोची रचना काय आहे, संकर्षणसोबत अजून या शोमध्ये कोण असणार, याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र संकर्षणला या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.