सान्या मल्होत्राला धर्मेशने केलं होतं रिजेक्ट, ‘डान्स दीवाने’ च्या मंचावर सगळ्यांसमोर तिनेच सांगितला अनुभव!

धर्मेशने ते अपयशच सान्याच्या यशामागचं कारण असल्याचं म्हंटलं. ” त्यावेळी निवड झाली नसली तरी त्याच जिद्दीने तू पुढे गेलीस.” असं धर्मेश म्हणाला. या एपिसोडमध्ये सान्या मल्होत्राची धमाल पाहायला मिळणार आहे.

  अभिनेत्री सान्या मल्होत्राने ‘डान्स दीवाने’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सहा वर्षांपूर्वी कोरियोग्राफर धर्मेशने तिला रेजेक्ट केलं होतं हा अनुभव सांगितला. सान्याचा हा अनुभव ऐकून सगळेचं थक्क झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  सान्याने करियरच्या सुरुवातीचा एक अनुभव शेअर केला. ” आयुष्य एक चक्र आहे. आज मी पुन्हा इथे आलेय. सहा वर्षांपूर्वी मी याच स्टुडीओत आले होते. डान्सच्या ऑडिशनसाठी. मात्र माझी निवड झाली नाही. रात्री एक वाजता मी फ्रि झाले. त्यानंतर रडत माझ्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं कि, माझी निवड झाली नाही. धर्मेश सर तुम्हीच होता. तुमच्यामुळे माझी निवड झाली नाही. पण आज मी इथे आहे. माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी.” असं सान्य़ाने सांगितलं. तिचा हा अनुभव ऐकून सगळेच थक्क झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)

  यावर धर्मेशने ते अपयशच सान्याच्या यशामागचं कारण असल्याचं म्हंटलं. ” त्यावेळी निवड झाली नसली तरी त्याच जिद्दीने तू पुढे गेलीस.” असं धर्मेश म्हणाला. या एपिसोडमध्ये सान्या मल्होत्राची धमाल पाहायला मिळणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sanya Malhotra💥 (@sanyamalhotra_)