सारा अली खानने सावत्र आई करीना कपूरवर केला प्रेमाचा ‘असा’ वर्षाव

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री करीना कपूर खान आज 42 वर्षांची झाली आहे. चाहते सतत अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. करीना आज तिचा वाढदिवस तिच्या कुटुंबासोबत एका खास पद्धतीने साजरा करत आहे. मलायका अरोरा, अमृता अरोरा, नीतू कपूर, कुणाल खेमू, सबा पतौडी, सोहा अली खान यांसारख्या सेलिब्रिटींनी रात्री उशिरा पोस्ट जारी करून करिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय करिनाची सावत्र मुलगी सारा अली खाननेही अभिनेत्रीला खास शुभेच्छा दिल्या.

    साराचे तिची सावत्र आई करीना कपूर खानसोबत नेहमीच चांगले संबंध आहेत. तिच्या सावत्र आईला शुभेच्छा देताना, साराने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले – ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा… आज तुम्हाला खूप प्रेम, आनंद मिळो! मला आशा आहे की, पुढचे वर्ष तुमचे चांगले जावो!”

    करीना कपूर खान शेवटची आमिर खानच्या लाल सिंग चड्ढामध्ये दिसली होती. यामध्ये तिने आमिरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. ती लवकरच जयदीप साहनी आणि विजय वर्मा यांच्या विरुद्ध सुजॉय घोषच्या डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्समधून ओटीटी पदार्पण करणार आहे.