sara ali khan

अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या आगामी ओरिजिनल चित्रपटात ‘ए वतन मेरे वतन’(E Vatan Mere Vatan) मध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

    प्राइम व्हिडीओने (Amazon Prime Video) आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सर्वात आधी देण्यासाठी वरूण धवनची निवड केली असून वरूण धवनने (Varun Dhavan) नुकत्याच त्यांच्या ओरिजिनलच्या आगामी चित्रपटाबाबत खास खुलासा केला आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या आगामी ओरिजिनल चित्रपटात ‘ए वतन मेरे वतन’(E Vatan Mere Vatan) मध्ये सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

    वरुणने त्याच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये खुलासा केला की, सारा अली खान १९४२ मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या काल्पनिक कथेत एका शूर, स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या महिलेची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. दारब फारुकी आणि कन्नन अय्यर लिखित ‘ए वतन मेरे वतन’ हा थ्रिलर ड्रामा, सत्य घटनांवर आधारित आहे.

    धर्माटिक एंटरटेनमेंट प्रॉडक्शन अंतर्गत, या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता करत असून, सोमेन मिश्रा सह-निर्माता आहेत. याचे दिग्दर्शन कन्नन अय्यर करत आहेत. अमेझॉन ओरिजिनल चित्रपट रिलीज झाल्यावर प्राइम सदस्यांसाठी २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध असेल.