सारा अली खाननं बिकनीमधील फोटो केले शेयर, यूजर्सने केलं ट्रोल; म्हणाले- पापा बघतील तर…

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता साराने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत ज्यासाठी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

  सारा अली खान (Sara Ali Khan)सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेयर करते. काही दिवसांपुर्वी तिने केदारनाथला भेट देत तिथले फोटो शेअर केले होते. आता नुकतचं तिने पुन्हा तिचे नवे फोटे शेअर केले आहेत, मात्र यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. साराने  तिचे बिकनीतील काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सारा तिची फिट बॉडी दाखवत आहे. साराने हलक्या निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. साराची बॉडी पाहिल्यानंतर चाहते तिची स्तुती करत आहेत तर काही यूजर्स तिला ट्रोल करत आहेत.

  साराला ट्रोल करण्यात येतयं

  साराच्या बिकनीमधील फोटोला युझर्स कमेंट करत आहे की हे सर्व आपल्याला शोभत नाही. तर कोणी लिहिले, सोशल मीडियावर तुम्ही काहीही शेअर करा. तर एकाने लिहिले की मोठी माणसे, पण लहान कपडे. तर एकाने कमेंट केली की, सारा तू फक्त पारंपारिक कपड्यांमध्येच छान दिसतेस. एकाने लिहिलं होतं की, पाप्पा बघून काय विचार करतील? थोडी तरी लाज बाळगा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  साराचे आगामी चित्रपट

  साराच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, नुकतेच करणने तिच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये सारा पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली आहे आणि माईक धरून आहे. ए वतन मेरे वतन असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे.

  याशिवाय सारा आजकाल मेट्रोमध्ये अनन्या पांडेचा बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.