शुभमन गिलसोबतचे फेक फोटो व्हायरल झाल्यावर सारा तेंडुलकर संतापली, युजर्सला फटकारले

काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ आणि रश्मिका मंदान्नाप्रमाणे सारा तेंडुलकरही डीपफेक फोटोंची शिकार झाली होती. ज्यावर त्यांनी आता मौन तोडले आहे.

    सारा तेंडुलकर संतापली : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर भारतीय क्रिकेटर शुभमन गिल सोबत नात्यामध्ये आहे असा अनेक अफवा पसरल्या आहेत. बऱ्याचदा सारा स्टेडियममध्ये शुभमन गिलला प्रोत्साहन देताना दिसली. या दोघांचं नातं सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच, साराने अशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने तिचा राग व्यक्त केला आहे. नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या.

    सारा तेंडुलकरने केला तिचा संताप व्यक्त
    काही दिवसांपूर्वी कतरिना कैफ आणि रश्मिका मंदान्नाप्रमाणे सारा तेंडुलकरही डीपफेक फोटोंची शिकार झाली होती. ज्यावर त्यांनी आता मौन तोडले आहे. आता साराने एक लांबलचक पोस्ट शेअर करत यावर तिने आपला राग व्यक्त केला आहे. साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “सोशल मीडिया हे आमच्यासाठी आनंद, दु:ख आणि दैनंदिन घडामोडी शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. पण तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारे काही लोक खूपच चिंताजनक आहेत कारण ते इंटरनेटचे सत्य आणि सत्यता हिरावून घेते.”

    माझे डीपफेक फोटो वास्तवापासून दूर आहे – सारा
    साराने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “माझे डीपफेक चित्रे वास्तवापासून दूर आहेत. X. पूर्वी ट्विटरवर असलेली काही खाती लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने स्पष्टपणे तयार केली गेली आहेत. माझे X वर खाते नाही. पण मला आशा आहे की X अशा खात्यांकडे लक्ष देईल आणि त्यांना निलंबित करेल. मनोरंजन कधीही सत्याच्या किंमतीवर नसावे. “आम्ही विश्वास आणि वास्तविकतेवर आधारित संवादाचे समर्थन केले पाहिजे.”