satish kaushik net worth property in 2023 and family wife children read the details in marathi nrvb

सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश कौशिक वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा सतीश आज सगळ्यांना रडवत निघून गेला. तो आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सतीश यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक (Bollywood Actor Satish Kaushik) यांच्या मागे पत्नी शशी कौशिक (Wife Shashi Kaushik) आणि मुलगी वंशिका (Daughter Vanshika) आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी बेस्ट फ्रेंड अनुपम खेर (Anupam Kher) यांनी सोशल मीडियावर (Social Media) दिली आहे. अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश कौशिक वयाच्या अवघ्या ६६ व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा सतीश आज सगळ्यांना रडवत निघून गेला. तो आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. सतीश यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे. अभिनेत्याच्या निधनाची बातमी बेस्ट फ्रेंड अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिली आहे. सतीश कौशिक यांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मागे ठेवली आहे.

सतीश कौशिक यांनी जवळपास तीन दशकांचा काळ बॉलिवूडमध्ये व्यतीत केला आहे. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत त्यांनी काम केले. २०२३ मध्ये सतीश कौशिक यांची एकूण संपत्ती ४० कोटी रुपये होती. आपल्या अभिनय कारकिर्दीतून त्यांनी करोडो रुपयांची संपत्तीही निर्माण केली.

सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण करोलबाग येथील शाळेत केले आणि नंतर १९७२ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कोरेमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी, सतीश बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच एक कसलेले थिएटर कलावंत होते.

अभिनेता सतीश कौशिक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बराच काळ व्यतीत केला होता. ‘मौसम’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. ते अभिनेता होतेच आणि निर्मातेही होते. त्यांनी आपल्या कॉमेडीने लाखो लोकांची मने जिंकली. सतीश कौशिक यांनी १९८३ मध्ये आलेल्या मासूम चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर त्यांना दिग्दर्शनात हात आजमावण्याची संधी मिळाली आणि ‘जाने भी यारों’ या कल्ट चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले असावे.