malyalam actress

मॉलीवुड अभिनेत्री लीना अँटनी (Mollywood Actress Leena Antony) यांनी सप्टेंबर 2022 मध्ये परीक्षा दिली होती. ज्याचा रिझल्ट नोव्हेंबर 2022 मध्ये आला तेव्हा त्या केमिस्ट्री आणि मॅथेमेटिक्समध्ये फेल झाल्या होत्या. त्यानंतर वर्ष वाचवण्यासाठी त्यांनी SAY परीक्षा दिली आणि त्या त्यात पास झाल्या. आता त्या प्लस वन इक्विवेलेंस टेस्ट देऊ शकतात.

    तिरुवनंतपुरम : असं म्हणतात की शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. हे एका अभिनेत्रीने आता सिद्ध केलं आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला मॉलीवुड म्हटलं जातं.मॉलीवुड अभिनेत्री लीना अँटनी (Mollywood Actress Leena Antony)चं बघा ना त्यांनी दहावीची परीक्षा पास केली आहे. ही परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये झाली होती. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की 73 वर्षांच्या लीना अँटनी दोन विषयांमध्य नापास झाल्या होत्या, मात्र त्यांनी  Save A Year (SAY) परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवलं. महेशिनते प्रथिकारम (Maheshinte Prathikaram) या 2016 मध्ये आलेल्या मल्याळम फिल्ममध्ये त्यांनी काम केलं होतं. दहावीची परीक्षा देऊन त्या थांबल्या नाही त्या इंग्लिश शिकत आहेत.

    लीना कलामंडलम अश्वथीमध्ये कूडियाट्टम शिकत आहेत. कूडियाट्टम केरळ राज्यातील एक ट्रॅडिशनल परफॉर्मिंग आर्ट आहे. सोशल मीडियावर लीना यांच्या शिक्षणाविषयी ऐकल्यानंतर शिक्षण मंत्री वी शिवनकुट्टी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    लीना यांनी सप्टेंबर 2022 मध्ये परीक्षा दिली होती. ज्याचा रिझल्ट नोव्हेंबर 2022 मध्ये आला तेव्हा त्या केमिस्ट्री आणि मॅथेमेटिक्समध्ये फेल झाल्या होत्या. त्यानंतर वर्ष वाचवण्यासाठी त्यांनी SAY परीक्षा दिली आणि त्या त्यात पास झाल्या. आता त्या प्लस वन इक्विवेलेंस टेस्ट देऊ शकतात. लीना आपले पति केएल अँटनी यांच्या निधनानंतर (जे अभिनेता होते) आता पुस्तक आणि चित्रपटाच्या माध्यमातून स्वत:ला व्यस्त ठेवतात.

    जेव्हा 12 सप्टेंबर 2022 ला अलपुझा जिल्ह्यातील चेरथला भागातील सरकारी शाळेत त्या परीक्षा देण्यासाठी गेल्या तेव्हा लोकांनी त्यांना घेरलं होतं. माध्यमांनी मोठी बातमी केली होती. लीना यांनी 13 व्या वर्षी नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. वडीलांचं निधन झाल्यानंतर त्यांना कुटुंबासाठी आर्थिक जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्यांची सून माया कृष्णन यांच्या प्रोत्साहनामुळे 73 व्या वर्षी दहावीसारख्या समकक्ष परीक्षेत बसण्यासाठीचा त्यांचा आत्मविश्वास वाढला. लीना यांची मैत्रीण ललिता आणि इतर 23 जणांनी ही परीक्षा दिली.