
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते जगभरात आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशातच शाहरूख ‘पठाण’ (Pathan) या त्याच्या नव्या सिनेमा सह तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहे. मात्र शाहरुखचा हाच सिनेमा आता वादात अडकला आहे. या वादामुळे शाहरुखच्या चाहत्यावर्गाला काही फरक पडत नसला तरी ‘पठाण’ चित्रपटाचा वाद सुरु असतानाच शाहरुख खानची तब्बेत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले आहे.
शाहरुखने नुकतंच ट्विटरवर आस्क मी एनिथिंगचा सेशन घेतला होता. त्यात त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. एका चाहत्याने त्याला त्याची व्यायाम करण्याची प्रेरणा विचारली. त्यावर अभिनेत्याने तुम्ही सलग ७ दिवस व्यायाम करा. तुम्हाला सवय लागेल असं म्हटलं. त्यातच एका चाहत्याने त्याला त्याच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारलं. तो दिवसभरात काय काय खातो याबद्दल विचारणा केली. त्यावर शाहरुखने आपली तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं. शाहरुखने ट्विट करत लिहिलं, ‘आता माझी तब्येत थोडी बिघडलीये. मला इन्फेक्शन झालंय त्यामुळे काळजी घेतोय आणि सध्या तरी फक्त डाळ आणि भातच खातोय.’
Little unwell with infection so nowadays only daal chawal https://t.co/gWr1okvAST
— Shah Rukh Khan (@iamsrk) December 17, 2022
शाहरुखने हे ट्विट केल्यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. चाहते तो लवकरात लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. कामाबद्दल बोलायचं तर शाहरुखचा ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. किंग खानचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.