
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,'जवान' या सिनेमाने रिलीजच्या १२ दिवसांत ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
जवान : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा प्रदर्शित झालेला जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे आणि बऱ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. लवकरच शाहरुख चा जवान हा चित्रपट १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. ‘जवान’ हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा, अशी चाहते मागणी करत आहेत. नुकतीच जवान या चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) याने ईटाइम्सला मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
मुलाखतीमध्ये अॅटली म्हणाला,”ऑस्कर हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा अशी मागणी चाहते करत आहेत. चांगल्या कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकाची सिनेमाचा जागतिक पातळीवर गौरव व्हावा, अशी इच्छा असते. ‘जवान’ हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत असावा अशी माझीदेखील इच्छा आहे. किंग खान यांच्याकडे मी माझी इच्छा व्यक्त करणार आहे. त्यांनी होकार दिला तर लगेचच मी एन्ट्री पाठवणार आहे. जवान’ या सिनेमाचं कथानक २०२० मध्ये शाहरुख खान यांना ऐकवलं होतं. पण आमची पहिली भेट २०१९ मध्ये झाली होती. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मी त्यांना या सिनेमाची कथा ऐकवली होती. शाहरुख खान माझ्या सिनेमाचा भाग असावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे कोरोनाकाळातच मी त्यांना सिनेमाबद्दल सांगितलं
शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,’जवान’ या सिनेमाने रिलीजच्या १२ दिवसांत ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर भारतात या सिनेमाने ४९३.६३ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘जवान’ हा शाहरुख खानचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा आहे. याआधी त्याचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०५५ कोटींची कमाई केली.