सातासमुद्रापार लॉन्च होणार ‘जवान’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर! दुबईच्या बुर्ज खलिफा येथे फॅन्सच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

शाहरुख खानने सोशल मीडियावर यासंदर्भात माहित दिली. शाहरुख खान म्हणाला की तो केवळ ट्रेलर रिलीज करणार नाही, तर बुर्ज खलिफा येथे त्याच्या चाहत्यांनाही भेटणार आहे.

    बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या  (Shah Rukh Khan) आगामी जवान चित्रपटबद्दल फॅन्समध्ये मोठ उत्साह आहे. चित्रपटासाठी अडवान्स बुकींगही सुरू झाली आहे. याबद्दल शाहरुख खानने एक पोस्ट शेयर करत दुबईच्या बुर्ज खलिफा येथे त्याच्या ‘जवान’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार (Jawan Trailer On Burj Khalifa) असल्याचं सांगितलं आहे. तसेच,  शाहरुखने चाहत्यांना कार्यक्रमात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि त्यांना लाल रंगाचे कपडे घालून येण्यास  सांगितले आहे. अॅटली दिग्दर्शित, या चित्रपटात विजय सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पदुकोण देखील विशेष भूमिकेत आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

    शाहरुख खानने सोशल मीडियावर यासंदर्भात माहित दिली. शाहरुख खान म्हणाला की तो केवळ ट्रेलर रिलीज करणार नाही, तर बुर्ज खलिफा येथे त्याच्या चाहत्यांनाही भेटणार आहे.

    जवान’चं अॅडव्हान्स बुकिंग धडाक्यात

    शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचे जगभरात 1050.05 कोटी रुपयांचे कलेक्शन होते. अशा स्थितीत ‘जवान’ हा आकडाही पार करेल, असा अंदाज आहे. भारतात या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही, मात्र अमेरिकेपासून भारतापर्यंत सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरसाठी असलेली लोकांची उत्सुकता पाहून चाहते खूप उत्साहात असल्याचं दिसत आहे. अमेरिकेतील आगाऊ बुकिंगचे हे आकडे ‘पठाण’ पेक्षाही चांगले आहेत.