Shahrukh khan (7)

शाहरुख खान 21 डिसेंबर रोजी डंकी रिलीज होण्यापूर्वी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्याचे व्यवस्थापक आणि अंगरक्षक त्यांच्यासोबत होते.

  बॅालिवुडचा किंग खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी डंकी चित्रपटाच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डंकी चित्रपटाला रिलिज होण्यास काही दिवस असाताना अभिनेता शाहरुख खाननं आज वैष्णोदेवीचं दर्शन (Shah Rukh Khan visits Vaishno Devi temple ahead of ‘Dunki’ release nrps)घेतलं. या वर्षभरात वैष्णोदेवीला भेट देण्याची शाहरुखची ही तिसरी वेळ आहे. यावर्षी त्याने प्रत्येक चित्रपटापुर्वी वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. यापुर्वी त्याने पठाण चित्रपट रिलिज होण्यापुर्वीही  वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं होतं.

  पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याच्या अंगरक्षक आणि व्यवस्थापकांच्या समवेत जम्मूमधील पवित्र तीर्थस्थानाच्या खडबडीत वाटेवरून चालताना दिसत आहे. त्याने त्याच्या ब्लॅक पफर जॅकेटमध्ये हुडी घातलेलं दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती.

  यापुर्वी शाहरुखने वैष्णोदेवीचं घेतलं दर्शन

  शाहरुख खानने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. पठाण चित्रपटाच्या माध्यमातुन तो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यापूर्वी,वत्याने पठाणच्या रिलीजपूर्वी बरोबर एक वर्षापूर्वी 12 डिसेंबर रोजी वैष्णो देवीला भेट दिली होती. या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. जगभरात तब्बल ₹1000 कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर ऑगस्टमध्ये जवानाच्या रिलीजपुर्वीही त्याने पुन्हा वैष्णो देवीला भेट दिली. या चित्रपटाने जगभरात ₹1100 कोटींचा व्यवसाय केला. तो वर्षातील सर्वात मोठा हिट आणि आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला. आता डंकी चित्रपटाकडुनही शाहरुख खानला मोठ्या अपेक्षा आहेत. तर, डंकी चित्रपटाबद्द्ल फॅन्समध्येही खूप उत्साह असल्याचं दिसत आहे.

  21 डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

  चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाचं दिगदर्शन केलं आहे. गौरी खान, जियो स्टूडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 21 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.