
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक अॅटली आणखी एक चित्रपट बनवणार आहे ज्यामध्ये शाहरुख खानसोबत साऊथचा सुपरस्टार विजय थलापथी देखील दिसणार आहे.
मुंबई : शाहरुख खानच्या ‘जवान’ (Jawan) चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर चांगलच यश मिळवलं. या चित्रपटात शाहरुखसोबत साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती, अभिनेत्री नयनतारासोबत काम केलं. आता आता दिग्दर्शकाने एॅटनी खुलासा केला आहे की तो आगामी काळात एक चित्रपटावर काम करत आहे आणि या चित्रपटासाठी तो पुन्हा साऊथच्या एका सुपरस्टार आणि शाहरुखला पडद्यावर एकत्र आणणार आहे.
‘जवान’ रिलीज होण्यापूर्वी विजय थलपथी या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. या चित्रपटात विजय थलपथीच्या आगमनाची चाहत्यांना अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. पण आता अॅटली यांनीने घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक अॅटली आणखी एक चित्रपट बनवणार आहे ज्यामध्ये शाहरुख खानसोबत साऊथचा सुपरस्टार विजय थलापथी देखील दिसणार आहे.
अॅटली यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ’21 सप्टेंबर रोजी त्यांनी विजयला त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले होते आणि त्यांनी पार्टीला देखील हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुख आणि विजय यांच्यात संवाद झाला तेव्हा त्यांनी दिग्दर्शकाला फोन केला आणि सांगितले की जर तो दोन नायकांना घेऊन चित्रपट बनवत असेल किंवा कोणतेही प्लॅनिंग फायनल करायचे असेल तर दोघेही त्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.
View this post on Instagram
अॅटली पुढे म्हणाले, ‘शाहरुख सरांनी मला सांगितले की, जर मी दोन नायकांसह चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार केला तर ते दोघेही त्यासाठी तयार आहेत. विजय अण्णांनीही ‘अमा पा’ म्हटलं, म्हणून मी त्यावर काम करतोय. हा माझा पुढचा चित्रपट असू शकतो.