
सुहाना खानने इन्स्टा स्टोरीला हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिरर सेल्फी असून यात सुहाना तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.
किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर सक्रीय असते. आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती नेहमी चाहत्यांसाठी शेअर करते. बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधीच सुहानाचे लाखो चाहते आहेत. सुहानाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जिममधाला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सुहाना खानने इन्स्टा स्टोरीला हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिरर सेल्फी असून यात सुहाना तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. या फोटोत सुहानाने जिमचे कपडे परिधान केल्याचं दिसतंय. फोटो शेअर करताच काही तासातंच सुहानाचा फोटो व्हायरल होवू लागला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच सुहानाने तिचा वाढदिवस साजरा केलाय. यावेळी तिच्या बर्थ डे पार्टीच्या खास फोटोंनादेखील चाहत्यांची पसंती मिळाली असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. न्यूयॉर्कमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करतानाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.