kartik aaryan and shahid kapoor

शाहिद कपूरने (Shahid Kapoor)त्याचा जुहूमधील फ्लॅट 2014 मध्ये खरेदी केला होते. हा फ्लॅट प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे. कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) या फ्लॅटसाठी 45 लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट भरलं आहे.

    अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. आता या दोघांशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. कार्तिक आर्यन हा शाहिद कपूरच्या घरात भाड्याने राहणार आहे. कार्तिकने शाहिदचे जुहू येथील सी फेसिंग अपार्टमेंट भाड्याने (Shahid Kapoor Apartment On Rent) घेतलं आहे. या फ्लॅटचं भाडं ऐकाल तर तुम्हाला चक्कर येईल.

    रिपोर्टनुसार, शाहिदने त्याचा हा जुहूमधील फ्लॅट 2014 मध्ये खरेदी केला होते. हा फ्लॅट प्रणेता बिल्डिंगमध्ये आहे.  कार्तिकने या फ्लॅटसाठी 45 लाख रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट भरलं आहे. या फ्लॅटचे पहिल्या वर्षाचे भाडे 7.50 लाख रुपये आहे. हे भाडे दर वर्षी 7 टक्याने वाढणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. याचाच अर्थ कार्तिक आर्यन जर त्या घरात राहिला तर त्याला दुसऱ्या वर्षी 8.2 लाख आणि रु. तिसऱ्या वर्षी 8.58 लाख भाडे भरेल. या फ्लॅटसोबत कार्तिकला दोन कार पार्किंग स्लॉट देखील मिळणार आहेत.

    चार वर्षांपूर्वी शाहिद आणि मीरा यांनी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंक जवळचं आलिशन घर विकत घेतलं. गेल्या काही महिन्यांपासून या घरामध्ये काही बदल करण्यात आले. मीरा या घराच्या इंटेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती.  या घराची किंमत 58 कोटी रुपये आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जवळील ‘360-वेस्‍ट’ या बिल्डिंगच्या 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर शाहिदचे हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे. कार्तिक आर्यन वर्सोवा येथे अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने हे अपार्टमेंट 2019 मध्ये 1.60 कोटींना खरेदी केले होते.

    कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय हे सगळे कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘शहजादा’ येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.