शाहिद कपूरच्या ‘ब्लडी डॅडी’ची एचडी प्रिंट ऑनलाईन लीक, ओटीटी रिलीजनंतर काही तासातच घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

शाहिद कपूर हा अली अब्बास जफरच्या ‘ब्लडी डॅडी’ या ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटात ॲक्शन हिरोच्या रुपात दिसतोय. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच त्याची एचडी प्रिंट ऑनलाईन लीक (Bloody Daddy Online Leaked) झाली आहे.

    बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) ‘ब्लडी डॅडी’ (Bloody Daddy)या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. हा सिनेमा रिलीज तर झाला मात्र आता एक अशी गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. शाहिदचा हा चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याची पायरसी करण्यात आली आहे. (Entertainment News)

    शाहिद कपूर हा अली अब्बास जफरच्या ‘ब्लडी डॅडी’ या ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटात ॲक्शन हिरोच्या रुपात दिसतोय. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच त्याची एचडी प्रिंट ऑनलाईन लीक (Bloody Daddy Online Leaked) झाली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

    अनेक साईट्सवर लीक
    या सिनेमामध्ये शाहिदसोबत डायना पेंटी, रोनित रॉय, राजीव खंडेलवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. अशातच हा चित्रपट आता कोणी आणि कसा लीक केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. अनेक साईट्सवर हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याने चित्रपटाच्या टीमचं टेन्शन वाढलं आहे.

    36 दिवसांमध्ये तयार झाला ‘ब्लडी डॅडी’
    अशा अनेक टोरेंट साइट्स आहेत ज्यात नवीन चित्रपट आणि वेबसीरिज ऑनलाईन लीक केले जातात. मात्र अहोरात्र मेहनत करून तयार केलेल्या चित्रपटाच्या बाबतीत असं घडणं हे चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं नुकसान करणारं कृत्य आहे. चित्रपटासाठी कोटी रुपये खर्च होतात आणि अशा लीकमुळे त्या सगळ्या खर्चावर पाणी फिरतं. मेहनत वाया जाते. शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट फक्त 36 दिवसांमध्ये बनवण्यात आला आहे. इतक्या कमी वेळात ॲक्शन चित्रपट बनवणं सोपं नाही. हा चित्रपट जिओ सिनेमावर रिलीज झाला आहे.

    विवेक अग्नीहोत्रींची पोस्ट
    दरम्यान ‘ब्लडी डॅडी’ सारखा बिग बजेट चित्रपट फुकट का दाखवला जातोय हेच समजत नसल्याचे विवेक अग्नीहोत्री यांचं म्हणणं आहे. त्यांनी एका वृत्तपत्रातील ‘ब्लडी डॅडी’ जाहिरातीची क्लिप आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आणि लिहिले, ‘कोणी 200 कोटींचा चित्रपट फुकट का दाखवेल? हे कोणते व्यवसाय मॉडेल आहे? दु:खद बातमी म्हणजे बॉलिवूड आपल्या विनाशाचा आनंद साजरा करतंय.