pathaan press conference deepika shahrukh and john

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. त्याचा ‘झिरो’चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर चार वर्षांनी ‘पठाण’आला आणि लोकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं.

  शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर शाहरुख खानने ‘पठाण2’ची घोषणा (Pathaan 2 Announcement) केली आहे. आज ‘पठाण’ चित्रपटाच्या टीमकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने ही घोषणा केली.यावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता जॉन अब्राहम आणि चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हेदेखील उपस्थित होते.

  ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनंतर कमबॅक केलं आहे. त्याचा ‘झिरो’चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्यानंतर चार वर्षांनी ‘पठाण’आला आणि लोकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं. अनेकांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. काहींनी बॉयकॉटचा ट्रेंड सुरु केला पण याचा कोणताही परिणाम ‘पठाण’च्या कमाईवर झाला नाही. उलट चित्रपटाने जगभरात 5 दिवसांमध्ये 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

  पठाण 2 ची घोषणा
  शाहरुखने ‘पठाण’ला मिळालेल्या यशाबद्दल सगळ्यांचे आभार मानले. पठाण आला आणि हिट झाला. आता पुढे काय करणार? असा प्रश्न सिद्धार्थ आनंदने विचारला. त्यावेळी लोकांनीच ओरडून ‘पठाण 2 ’असं उत्तर दिलं. सिद्धार्थ म्हणाला, ‘इन्शा अल्लाह’. मग शाहरुख म्हणाला की, आमच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. इतका आनंद आम्हाला कधीच झाला नाही. जेव्हा सिद्धार्थ आनंदला ‘पठाण 2 ’ करायचा असेल तेव्हा मी त्यात काम करेन. जर चित्रपटाचा सीक्वेल आला तर त्यात काम करणं माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल. पुढे तो म्हणाला की पुढच्या वेळी आता केस कंबरेपर्यंत वाढवतो.

  आय एम द बेस्ट
  शाहरुख म्हणाला की, मी स्वत:ला बेस्ट मानतो त्यामुळे लोकांना मी उद्धट वाटतो. मात्र जर तुम्ही स्वत:ला बेस्ट मानलं नाही तर गुड किंवा बेटर बनू शकणार नाही. जेव्हा तुम्ही चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न कराल तेव्हा अकराव्या किंवा बाराव्या माळ्यावर पोहोचाल.

  ॲक्शन हिरो
  ‘पठाण’ चित्रपटाद्वारे शाहरुख खानची ॲक्शन हिरो बनण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. शाहरुखने आधी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी इंडस्ट्रीत ॲक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो. मात्र लोकांनी मला रोमँटिक हिरो बनवून टाकलं. ‘पठाण’  हा माझा पहिला ॲक्शन सिनेमा आहे. याविषयी जॉन म्हणाला की, शाहरुखने खूप छान ॲक्शन सीन दिले आहेत. तो एक  उत्कृष्ट ॲक्शन हिरो आहे असं वाटतं. मला आश्चर्य वाटतं की तो आधी ॲक्शन हिरो म्हणून कोणत्या चित्रपटात का आला नाही.

  दीपिका म्हणाली की, ‘पठाण’मधलं तिचं कॅरेक्टर खूप स्ट्राँग आहे. अभिनेत्रींसाठी इतकी स्ट्राँग कॅरेक्टर्स लिहिली जातायत याचा मला आनंद आहे. यापुढेही अशी पात्र लिहीली गेली पाहिजेत.