
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या हाऊस पार्टीच्या कपड्यांची थीम 'ब्लॅक' असल्यामुळे सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी काळ्या म्हणजेच ब्लॅक रंगाचे कपडे परिधान करून आले होते. सुरुवातीला सलमान पार्टीत दाखल होताच त्याने इव्हेंट कव्हर करण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्स सोबत आपलया वाढदिवसाचा केक कापला.
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. यानिमित्ताने जगभरातील सलमानच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध पद्धतीने चाहते सलमानला शुभेच्छा देत आहेत. अशातच सोमवारी रात्री सलमान खानच्या मुंबई येथील अर्पिता खानच्या घरी हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. मात्र यात सर्वात लक्ष वेधी ठरली ती म्हणजे बॉलिवूडचे ‘ करन – अर्जुन’ शाहरुख आणि सलमानची भेट.
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या हाऊस पार्टीच्या कपड्यांची थीम ‘ब्लॅक’ असल्यामुळे सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी काळ्या म्हणजेच ब्लॅक रंगाचे कपडे परिधान करून आले होते. सुरुवातीला सलमान पार्टीत दाखल होताच त्याने इव्हेंट कव्हर करण्यासाठी आलेल्या फोटोग्राफर्स सोबत आपलया वाढदिवसाचा केक कापला. सलमान खानच्या या बर्थ डे पार्टीमध्ये सर्वात उत्साह भरला जेव्हा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान या पार्टीत सामील झाला. पार्टी संपल्यानंतर सलमान खान एसआरकेला त्याच्या कारमध्ये सोडताना दिसला आणि दोघांनी एकमेकांना उबदार मिठी मारली.
सलमान खान सोबतच त्याची बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या दोन मुलांचा देखील वाढदिवस २७ डिसेंबर रोजी असतो. तेव्हा खान कुटुंबातील सलमान सोबत अर्पिता खानचा मुलगा अहिल आणि मुलगी आयत या दोघांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.