Suhana khan (7)

सुहानाने जमिनीत पैसे गुंतवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2023 मध्येही त्यांनी अलिबागमध्ये 12.19 कोटी रुपयांना 1.5 एकर जमीन खरेदी केली होती.

    शाहरुख खानची (shahrukh khan ) मुलगी सुहाना खानने (Suhana Khan) आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत केवळ बॉलिवूडमध्येच आपल्या करिअरची सुरुवात केली नाही तर गुंतवणुकीच्या जगातही प्रवेश केला आहे. सुहाना खानने अलीकडेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. सुहाना खानने अलिबागमध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही शेतजमीन आहे.

    रिपोर्ट्सनुसार, सुहानाने अलिबागच्या रायगड जिल्ह्यात 78,361 स्क्वेअर फूट जमीन अंदाजे 9.50 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. तिने  13 फेब्रुवारी रोजी 57 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे.

    सुहानाने जमिनीत पैसे गुंतवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2023 मध्येही त्यांनी अलिबागमध्ये 12.19 कोटी रुपयांना 1.5 एकर जमीन खरेदी केली होती. शाहरुख खानचाही अलिबागमध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्यात एक हेलिपॅडही आहे.