शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, किंग खानच्या ॲक्शनवर चाहते फिदा

शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित जवान सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. एकाहून एक दमदार ॲक्शन सीन, शाहरुखचा खलनायक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

    Trailer of Jawan : शाहरुख खानची (Shahrukh khan) प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित जवान सिनेमाचा ट्रेलर (trailer release) रिलीज झालाय. एकाहून एक दमदार ॲक्शन सीन, शाहरुखचा खलनायक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. (shahrukh khan jawan cinema trailer release king khan actions scenes nrsa)

    शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर आला आहे. या ट्रेलरकडून चाहत्यांना आधीच खूप अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षांपेक्षाही तो अधिक जबरदस्त असल्याचे दिसते. शाहरुख आणि त्याच्या गर्ल गँगची धमाकेदार ॲक्शन, सिनेमाचा स्केल, व्हिज्युअल्स केवळ लाजवाब आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर थिएटरमध्ये शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी होणार हे नक्की. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये तो संपूर्ण स्फोटक मसाला आहे जो सिल्व्हर स्क्रीनवर धमाका करणार आहे. दिग्दर्शक ॲटली यांनी शाहरुखला सिल्व्हर स्क्रीनवर अशा प्रकारे सादर केले आहे की त्याचे चाहते ‘जवान’ सिनेमा पाहायला नक्की थिएटरमध्ये जातील.

    शाहरुखचा धमाका

    ‘जवान’च्या अनाऊंसमेंट व्हिडिओमध्ये, शाहरुखचा चेहरा पट्टीने बांधलेला, जखमी पण पुढच्या मोठ्या लढतीसाठी सज्ज झालेला पाहून चाहते थक्क झाले. रोमँटिक-स्टायलिश-डॅशिंग ऑनस्क्रीन हिरो असा शाहरुखचा हा जबरदस्त अवतार सिनेमा रसिकांना आनंद देणार होता. ‘जवान’च्या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुखच्या हटके लूकची बरीच चर्चा झाली होती. पण आता ट्रेलरमध्ये या लूकसह शाहरुख ॲक्शन करताना दिसणारा आहे.

    नयनतारा आणि विजय सेतुपतीचा रॉकिंग अंदाज

    पोलिसाच्या भूमिकेत दिसणारी नयनताराही सिल्व्हर स्क्रीनवर जबरदस्त अवतारात दिसत आहे. आपल्या मिशनवर असलेल्या शाहरुखला रोखण्यासाठी नयनतारा प्रत्येक वादळाचा सामना करण्यास तयार आहे. तिचा ॲक्शन मोडही सिल्व्हर स्क्रीनवर खूप वादळी ठरणार आहे. विजय सेतुपतीला पाहणे ही प्रेक्षकांसाठीही पर्वणी ठरणार आहे.’जवान’च्या ट्रेलरमध्ये सेतुपती आणि शाहरुख यांच्यातील डायलॉग्ज सिनेमाची उत्सुकता वाढवणारे आहेत.

    ‘जवान’च्या टीझरमध्ये शाहरुखची गर्ल गॅंग पाहून चाहते खूप उत्सुक होते. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजिता भट्टाचार्य, गिरीजा ओक गोडबोले आणि आलिया कुरेशी या गर्ल गँगमध्ये आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुखसोबत या गर्ल गँगचे कनेक्शन अप्रतिम आहे. शाहरुखसोबत या मुली एक अशी टीम बनवत आहेत जी कोणत्याही शत्रूला तोंड देण्यास सज्ज आहे.

    ट्रेलरवरून तरी सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यात शाहरुख खानला यश आहे आहे. त्यामुळे आता पठाणप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर जवान सिनेमा आपली जादू दाखवणार का ते लवकरच कळेल.