मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बॅालिवूड सेलेब्रिटिंची मंदियाळी! शाहरुख खान,सलमान खान, पंकज त्रिपाठीसह अनेक कलाकार बाप्पा चरणी लीन

सिने जगतातील अनेक कलाकार रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खानसह जॅकी श्रॅाफ, सुनील शेट्टी, भूमी पेडणेकर, आशा भोसले यांचा समावेश होता.

    गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2023) चित्रपटसृष्टीत मोठी लगबग पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळीच्या घरी वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या बाप्पाच्या भक्तीत लीन दिसत आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बॅालिवूड सेलेब्रिटींची मंदीयाळी दिसली. शाहरुख खान, सलमान खान,सुनिल शेट्टी, पंकज त्रिपाठी, आशा भोसलेंसह अनेक कलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.

    शाहरुख-सलमानने एकत्र बाप्पाचं दर्शन घेतलं

    एकनाथ शिंदे यांच्या घरातून सलमान खान आणि शाहरुख खानचा फोटो समोर आला आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या सलमान आणि शाहरुखने एकनाथसोबत फोटो काढले. यावेळी लाल रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये सलमान खान एक स्वॅग लुक देत आहे. त्याचबरोबर निळ्या कुर्ता-पायजमामध्ये ‘ किंग खान’ ने हजेरी लावली. त्यांचा हा एकाच फ्रेममध्ये फोटोला चाहत्यांची चांगली पंसती मिळत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

    ‘या’ कलाकारांनीही लावली हजेरी

    यावेळी शाहरुख आणि सलमान व्यतिरिक्त अभिनेता स्टार पंकज त्रिपाठी देखील एकनाथ शिंदेच्या घरी आले होते. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही गणपतीचे दर्शन घेतलं. या सोबतच सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा, भूमी पेडणेकर, अदा शर्मा, राजुकमार, यांनीही हजेरी लावली होती.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)