
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) स्वदेश (Swades) या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीमध्ये अपघात झाला.
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) स्वदेस (Swades) या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री गायत्री जोशीचा (Gayatri Joshi) कार अपघात झाला आहे. ही दुर्घटना इटलीमध्ये (Italy) घडली आहे. यावेळी ती पती विकास ओबेरॉयसोबत लॅम्बोर्गिनी कारमध्ये होती. या अपघातात दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नसली, दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या स्विस जोडप्याचा या अपघातात मृत्यू झाला. सध्या गायत्रीच्या कार अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इटलीच्या सार्डिनिया भागात घडला. अपघाताच्या गायत्री जोशी आणि तिचा नवरा लॅम्बोर्गिनी कारमध्ये होते. त्याचवेळी त्याच्या गाडीच्या मागे आणखी काही वाहनेही जात होती. दरम्यान, एका मिनी ट्रकला ओव्हरटेक करत असताना मागून आलेल्या फेरारी कारने गायत्रीच्या कारला धडक दिली, त्यांनतर तिची गाडी मिनी ट्रकला धडकली. या धडकेत मिनी ट्रक पलटी झाला. यावेळी गायत्रीची कार दूर जाऊन पडली तर फेरारी कारमध्ये प्रवास करणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
व्हिडिओ व्हायरल
गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मागील बाजूने गाडी चालवणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात संपूर्ण व्हिडिओ कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक कार पुढे जात असून समोरून एक पांढऱ्या रंगाचा मिनी ट्रकही जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर कार मिनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते आणि दोघांमध्ये जोरदार टक्कर होऊन मिनी ट्रक पलटी होऊन 1 फेरारीला आग लागली. फेरारीमध्ये स्विस जोडप्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023