ED Notice to Gauri Khan | शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीनं पाठवली नोटीस, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी होणार चौकशी! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Dec 20, 2023 03:39 PM

ED Notice to Gauri Khanशाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीनं पाठवली नोटीस, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी होणार चौकशी!

शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीनं पाठवली नोटीस, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी होणार चौकशी!

कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  अभिनेता शाहरुख खानचा डंकी (Dunki) चित्रपट गुरुवारी (21 डिसेंबर) ला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्माती आणि शाहरुख खानची पत्नी गौरी (Gauri Khan) खानबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED ) गौरी खानला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी नोटीस (ED Notice to Gauri Khan)  पाठवली आहे. ही नोटीस रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुप घोटाळ्याशी संबंधित आहे. गौरी खान या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गौरी खानला 2015 मध्ये रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आली होती. या कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे, त्यामुळे गौरी खानही ईडीच्या रडारवर आली आहे. याप्रकरणी गौरी खानचा जबाब नोंदवला जाणार आहे. वास्तविक, तुलसियानी ग्रुपने गौरी खानला किती मोबदला दिला आणि त्यांच्यात काय करार झाला याची माहिती ईडीला हवी आहे.

  मुंबईचे रहिवासी किरीट शहा यांनी केलेल्या आरोपानंतर तुलसियानी कंपनीविरोधात ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की पैसे देऊनही तुलसियानी यांनी त्यांना ना फ्लॅट दिला ना पैसे परत केले. यानंतर त्यांनी कंपनीचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर गुन्हा दाखल केला.

  Comments
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.