शाहरुख खानंन पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मनं, स्टेडियमवरच्या ‘या’ कृतीमुळे होतयं कौतुक, व्हिडिओ व्हायरल!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने पुन्हा एकदा असा पराक्रम केला आहे, जो पाहिल्यानंतर त्याचे चाहते त्याचे सर्वात मोठे चाहते झाले आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या औदार्यासाठी ओळखला जातो. त्याचा उत्कृष्ट अभिनय आणि त्याचा स्वभाव त्याला इतर कलाकारांपेक्षा पूर्णपणे वेगळा बनवतो. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा बादशाह म्हटले जाते. तो आपले मोठेपण वारंवार सिद्ध करत असतो. आयपीएल मॅचदरम्यानही असे काही घडले, जे पाहिल्यानंतर सगळे त्याचे कौतुक करत आहेत.

  शाहरुख खाननं जिंकलं चाहत्यांचं मनं

  ‘केकेआर’चा सामना संपल्यानंतर शाहरुख खानच्या एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ बनवला. जो नंतर त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून तो डाउन टू अर्थ व्यक्ती असल्याचे सिद्ध होत आहे.

  काल कोलकाता येथील ईडन गॉर्डन येथे ‘केकेआर’चा सामना झाला. यावेळी शाहरुख खानही त्याच्या टीमला चिअर अप करण्यासाठी तिथे उपस्थित होता. सामना संपल्यानंतर सगळे तिथून निघून गेले. मात्र शाहरुख खानने ‘कोलकाता नाईट रायडर्स’चे झेंडे बसण्याच्या जागेवर पडलेले पाहिल्यानंतर किंग खानने स्वत: ते गोळा करण्यास सुरुवात केली.

  शाहरुख खानचा व्हायरल व्हिडिओ

  शाहरुख व्हीआयपी सेक्शनच्या सीटवर पडून जमिनीवर फेकलेले केकेआरचे झेंडे उचलत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शाहरुखला असे कृत्य करताना पाहून त्याचे चाहते त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी त्याने काही चाहत्यांसोबत हस्तांदोलनही केलं आणि चाहत्यांना फ्लाइंग किसही देतो. तर, आयपीएल संपल्यानंतर शाहरुख खानने क्रिकेटच्या खेळपट्टीवर काही खेळाडूंची भेट घेतली आणि काही चाहत्यांचीही भेट घेतली.

  शाहरुख खानचा आगामी चित्रपट

  शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना खान देखील असणार आहे. वडील आणि मुलगी एकत्र चित्रपटाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे.