jhoome jo pathaan

पहिल्या गाण्याच्या वादानंतर ‘पठाण’च्या (Pathaan) दुसऱ्या गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हा प्रश्न होता. पण नकारात्मक प्रमोशनचा फायदा चित्रपटाला झाला आहे. ‘झुमे जो पठाण’ (Jhoome Jo Pathaan Song) गाणं प्रदर्शित होताच अर्ध्या तासातच एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

    शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता या गाण्यानंतर चित्रपटामधील दुसरं गाणं ‘झुमे जो पठाण’ (Jhoome Jo Pathaan) रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. शाहरुखच्या एका चाहत्याने हे गाणं रिलीज झाल्यानंतर एक मार्मिक ट्विट केलं आहे.

    ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये दीपिकाने भगवी बिकिनी परिधान केल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. वाद चिघळला.  आता ‘झुमे जो पठाण’ गाणं रिलीज झाल्यानंतर शाहरुखच्या एका चाहत्याने ट्विट करत लिहिलं आहे की, ‘भक्तांनो जा आणि ‘झुमे जो पठाण गाणं बघा. बॉयकॉट करण्याचा नवा मुद्दा शोधा. दोन पैसे मिळतील आणि काही कामही मिळतील. एका युजरने म्हटलं की, बॉयकॉट गँग आता सांगा या गाण्यामध्ये काय चुका आहेत. आम्हालाही या गाण्यामध्ये चूक शोधून सापडली नाही. आता कसं करणार बॉयकॉट.

    पहिल्या गाण्याच्या वादानंतर दुसऱ्या गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? हा प्रश्न होता. पण नकारात्मक प्रमोशनचा फायदा चित्रपटाला झाला आहे. ‘झुमे जो पठाण’ गाणं प्रदर्शित होताच अर्ध्या तासातच एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

    या गाण्यामध्ये शाहरुख व दीपिकाची हटके केमिस्ट्री दिसत आहे. तर अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख करत असलेलं काम त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियाद्वारे शाहरुखला त्याचे चाहते पाठिंबा देत आहेत