shaktimaan

यावेळी मालिका नव्हे तर चित्रपटाच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ साकारणारे (Shaktimaan) अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  दूरदर्शन वाहिनीवरील नव्वदच्या दशकातील ‘शक्तिमान’ (Shaktimaan) ही अत्यंत लोकप्रिय मालिका होती. आजही प्रत्येक मुलाला आपलं बालपण आठवलं की ‘शक्तिमान’ आठवतो. (Shaktimaan Back)आता पुन्हा एकदा प्रेक्षक हा अनुभव घेऊ शकणार आहेत. (Shaktimaan Movie) मात्र यावेळी मालिका नव्हे तर चित्रपटाच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अभिनेते मुकेश खन्ना यांनी सांगितलं की, “हा चित्रपट माझ्याकडे कित्येक वर्षांनी आला आहे. ‘शक्तिमान’चा दुसरा सीझन यायला पाहिजे, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. पण यावेळी मला ‘शक्तिमान’ छोट्या पडद्यावर नाही तर चित्रपटामध्ये हवा होता.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)


  ते पुढे म्हणाले, “सोनी पिक्चर्सबरोबर मी या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असेल. जवळपास ३०० कोटी रुपये बजेट असेल. यापेक्षा अधिक मी या चित्रपटाबाबत बोलू शकत नाही. या चित्रपटामध्ये बऱ्याच नव्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.”

  त्यांनी पुढे सांगितलं की,“या चित्रपटाची कथा मी तयार करुन घेतली आहे. ‘शक्तिमान’च्या कथेमध्ये कोणताच बदल नको अशी मी एक अट ठेवली होती. चित्रपटात शक्तीमान कोण असणार? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, “जर दुसऱ्या कोणी अभिनेत्याने शक्तीमानची भूमिका साकारली तर देश त्याचा स्वीकार करणार नाही. पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.