
शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. शाल्व व श्रेयाच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला.
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu kashi Tashi Me Nandayla) ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील ओम व स्वीटूच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. अभिनेता शाल्व किंजवडेकरने (Shalva Kinjawadekar) या मालिकेत ओमची भूमिका साकारली होती. शाल्वला आता त्याच्या खऱ्या आयुष्यात स्वीटू भेटली आहे. लवकरच तो विवाहबंधनात (Shalva Kijawadekar Wedding) अडकणार आहे.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, शाल्व किंजवडेकर गर्लफ्रेंड श्रेया डाफळापूरकरबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. शाल्व व श्रेयाच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. नुकताच त्यांचा मेहंदी सोहळा पार पडला. शाल्व व श्रेयाच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेहंदी सोहळ्यासाठी शाल्व व श्रेयाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ट्युनिंग केलं होतं.
शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रेयाचं सौंदर्य खुलून आलं होतं. शाल्व व श्रेयाच्या मेहंदी सोहळ्यासाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही हजेरी लावली होती. शाल्व व श्रेया गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रेया स्टायलिस्ट आहे. शाल्वने मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.
बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजनसृष्टीदेखील लगीनघाई सुरू आहे. केएल राहुल आथिया शेट्टीनंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी लग्नबंधनात अडकले आहेत. आता शाल्व आणि श्रेयाच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. व्हायरल होणाऱ्या मेहंदीच्या फोटोत शाल्व आणि श्रेया दोघेही आनंदी दिसत आहेत. रिलेशनला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.