shamshera

‘शमशेरा’मधील रणबीर कपूरचा लूक व्हायरल (Shamshera Ranbir Kapoor Look) झाला आहे. ट्विटरवर रणबीरचं (Shamshera Poster Leaked) कॅरेक्टर पोस्टर कुणीतरी लीक केलं आहे.

    रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाची एक झलक बघायला मिळावी, अशी रणबारच्या चाहत्यांची इच्छा होती. आता ‘शमशेरा’मधील रणबीर कपूरचा लूक व्हायरल (Shamshera Ranbir Kapoor Look) झाला आहे. ट्विटरवर रणबीरचं कॅरेक्टर पोस्टर कुणीतरी लीक केलं आहे. त्यामुळे ट्विटरवर सध्या #ShamsheraPosterLeaked ट्रेंड सुरु झाला आहे.

    भली मोठी (Bollywood News) दाढी, मोठ्या मिशा, लांब केस असलेला आणि रणबीरचा ‘शमशेरा’मधला डाकुसारखा लूक प्रेक्षकांना चकीत करुन गेला आहे. त्याच्या हातात एक शस्त्रही दिसत आहे. एकीकडे रणबीरच्या ब्रम्हास्त्रची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे शमशेरच्या लूकनं हवा केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या चित्रपटाचा लूक ट्रेडिंग असल्याचे दिसून आले आहे.

    पोस्टरमध्ये रणबीरचा रुद्रावतार दिसत आहे. ‘करम से डकैस, धर्म से आजाद’, अशी शमशेरा चित्रपटाची टॅगलाइन आहे.

    ट्विटरवर सगळेजण रणबीरचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.

    ‘अतिशय शानदार आणि जानदार पोस्टर आहे. रणबीरच्या या चित्रपटाची आणखी वाट बघू शकत नाही’, असंही एकाने ट्विटरवर लिहिलं आहे.