शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाची वैद्यकीय तपासणी होणार

रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला आज शनिवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. परंतु कोर्टात हजर करण्यापूर्वी या दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शौविक आणि सॅम्युअलला सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणी नेण्यात येणार आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर ड्रग्ज खरेदी-विक्री संदर्भात विविध प्रकारची माहिती समोर येत आहे. आज ड्रग्ज खरेदी-विक्री आणि सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती (rhea chakraborthy)चा भाऊ शोविक चक्रवर्ती (showik chakraborthy) याच्यासह सॅम्युअल मिरांडा(samual miranda) या दोघांनाही अटक (arrested) करण्यात आली आहे.

रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला आज शनिवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. परंतु कोर्टात हजर करण्यापूर्वी या दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शौविक आणि सॅम्युअलला सायन रूग्णालयात वैद्यकीय तपासणी नेण्यात येणार आहे. तसेच तपासणीनंतर त्यांना १२ वाजताच्या सुमारास कोर्टामध्ये हजर करण्यात येण्याची शक्यता आहे.