शहनाज गिल रुग्णालयात दाखल! अन्नातून विषबाधा झाल्यानं आजारी, इंस्टाग्राम लाईव्ह करत दिली माहिती

शहनाज गिल सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहेत. तिला अन्नातून विषबाधा झाली आहे.

    सध्या शहनाज गिल (Shehnaaz Gill) तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता तिच्याशी संबंधित एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शहनाज गिल रुग्णालयात (Shehnaaz Gill Hospitalised ) दाखल झाली आहे. तिला भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटिंनी रुग्णालय गाठलं आहे. पण  शहनाजला नेमकं काय झालं, ज्यामुळे तिला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, चला जाणून घेऊया.

    मुंबईतील रुग्णालयात दाखल

    शहनाज गिल सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहेत. अभिनेत्री अन्नातून विषबाधा झाली आहे. अलीकडेच शहनाज  ‘थँक यू फॉर कमिंग’चे जोरदार प्रमोशन करताना दिसली. प्रमोशन दरम्यान ती आजारी पडली. सोमवारी रात्री उशिरा चित्रपटाची सहनिर्माती रिया कपूर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचली.

    इंस्टाग्रामवरील पापाराझींनी रिया कपूर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना आणि तिच्या कारमध्ये बसल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये शहनाजच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. एका चाहत्याने लिहिले, ‘लवकर बरी हो… स्वतःची काळजी घे.’ दुसर्‍याने ‘तू आमची सिंहीण आहेस’ अशी कमेंट केली. काही लोकांनी म्हण्टलं की, शहनाजला वाईट नजर लागली आहे. लवकर बरे हो, शहनाज असं देखील म्हण्टलं आहे.